सोलापूर – बेकायदेशीर रित्या बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर येथील एका तरुणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
राजेश भाऊसाहेब जाधव (रा. नळेगाव व्हीसीटी नगर, अहमद नगर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत येथील छ. शि.म.सर्वो . रुग्णालयाचे (सिव्हिल हॉस्पिटल ) अधिष्ठाता
डॉ. ऋत्विक देविदास जयकर ( वय- ५४ वर्षे, रा. गौरव रेसी रेल्वे हॉस्पीटल, प्लॉट नं. ३०१, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील आरोपीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळणेकामी जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय अहिल्यानगर येथे अहमद नगर या रहिवाशी आधार कार्डसह अर्ज सादर केला होता. परंतु चाचणी अंतर्गत ते अपात्र ठरल्याने त्यास दिव्यांग प्रमाणपत्र नाकारले होते. त्यानंतर आरोपीने येथील सिव्हील हॉस्पीटल येथे युडीआयडी ऑनलाईन प्रक्रियेने अर्ज सादर करुन सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर असे बनावट पत्ता असेलेल बनावट आधार कार्ड जोडले . परंतु आरोपीने आवश्यक कोणत्याही प्रचलित कार्यपध्दतिचा अवलंब न करता कान नाका घसा तज्ञ यांचेकडे तपासणी न करता रुग्णालयात प्रमाणपत्र दिलेबाबात नोंद करण्यात आलेली नसताना देखील आरोपीने दि. ११ मे २०२६ ते दि. २० मे २०२६ दरम्यान, श्री छ.शि.म.सर्वो. रुग्णालयातून ४५% अपंगत्वाचे दिव्यांग प्रमाणपत्र बेकायदेशीर प्राप्त केले . व ते खरे आहे असे भासवून पाटबंधारे विभाग अहिल्यानगर येथील कार्यालयात जमा करुन त्याव्दारे शासकीय नोकरी मिळविली . लाभ घेवून शासनाची फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे म्हणून. पो .नि- लकडे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे .
Post Views: 38