अक्कलकोट – शहर – तालुक्यातील जनतेने पोलीस खात्यात कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच सहकार्य केले आहे. पोलिस आणि जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार असल्याचे मत अक्कलकोटचे नूतन पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र टाकणे यांनी व्यक्त केले.
अक्कलकोट तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून राजेंद्र टाकणे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. या अनुषंगाने पत्रकारानी पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र टाकणे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला .याप्रसंगी डीवायएसपी राजेंद्र टाकणे यांनी अक्कलकोट शहर – तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली. या अगोदर डीवायएसपी राजेंद्र टाकणे यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. अक्कलकोट शहर – तालुक्यात पोलीस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काम केले आहे. अलीकडच्या काळात पोलीस खात्यांमधील काही पोलीस कर्मचाऱ्यांमुळे जनतेमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल नाराजी निर्माण झाली आहे. पोलीस खात्यावरील जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. जनतेला पोलीस प्रशासन हे आपले आहे ही भावना निर्माण करावी लागणार आहे. पोलिस आणि जनतेमध्ये समन्वय साधून काम करावे लागणार आहे. अक्कलकोट तालुक्यातील जनता ही अतिशय चांगले असून गुड पोलीसिंगचा संदेश द्यावा लागणार आहे असे डीवायएसपी राजेंद्र टाकणे यांनी सांगितले. तसेच अक्कलकोट शहर तालुक्यात अनेक वेळा वैयक्तिक रोषातून वाद विवाद झाले. यावेळी पोलीस प्रशासनाने ते स्वतः अंगावर घेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठोस भूमिका घेतली होती असे डीवायएसपी राजेंद्र टाकणे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी सपोनी दत्तात्रय घंटे , पोलीस कर्मचारी धनराज शिंदे , चंद्रकांत उपाध्ये आदी उपस्थित होते.
Post Views: 26