बार्शी – पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीणचे विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सपोनि अक्षय सोनवणे यांनी गुन्हेगारांविरुद्ध धडाकेबाज प्रतिबंधक कारवाईची मालिका सुरु केली आहे.
आगामी आषाढीवारी तसेच विविध सण-उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित व निर्विघ्न वातावरणात पार पडावेत, तसेच रेकॉर्डवरील, ‘टू प्लस’ व सराईत गुन्हेगारांमध्ये सुधारणा होऊन त्यांनी कायद्याचे पालन करावे आणि पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये, या उद्देशाने कठोर प्रतिबंधक कारवाईचा धडाका सुरु करण्यात आला असून, त्याच मोहिमेअंतर्गत आज एकूण ५३ आरोपींविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर, बीट अंमलदार सदाशिव गवळी, सोमनाथ खांडेकर, अरुण डुकळे, प्रदीप चौधरी, गणेश दळवी तसेच बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई सातत्याने राबविण्यात येत असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या कठोर व प्रभावी कारवाया सुरु राहणार आहेत.
Post Views: 11