बार्शी – संत निरंकारी मंडळाच्यावतीने आज रक्तदान शिबीर पार पडले. त्या शिबिराचे उद्घाटन डॉ. श्रीकांत शिंदे (ग्रामीण रुग्णालय बार्शी) श्री. जाधव (एपीआय बार्शी शहर), चांदभाई तांबोळी (ज्ञानप्रचारक सोलापूर झोन) यांच्या करकमलाद्वारे झाले, डॉ. शिंदे यांनी आपल्या विचारातून रक्तदानाविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली.
जाधव यांनी आपल्या विचारातून मंडळाच्या कार्याचे कौतुक केले, चांदभाई तांबोळी महाराजांनी आपल्या विचारातून सद्गुरुचा महिमा व मंडळाचे रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, जलस्वच्छ अभियान, वृक्षारोपण, आग्य शिबीर या कार्याची माहिती दिली. सोलापूर झोनमध्ये वर्षभरात ३ हजारापेक्षा जास्त रक्तदान केले जाते. ‘खून का बदला जरुर खूनसे लेंगे लेकिन खून नालीयोमे नही नाडीयोमे बहना चाहिये’ ( निरंकारी बाबाजी) रक्त हे कुठल्याही कारखान्यात तयार होत नसून ते केवळ मानवी शरीरातच तयार होते, या कार्यक्रमासाठी डॉ. सावंत, डॉ. सावंत मॅडम, समाधान राऊत (माढा ब्रांच मुखी), संदीप बोटे, शशिकांत शिंदे, राजेंद्र चव्हाण, सुधीर सुमंतसर (रामभाई शहा ब्लड बँक बार्शी ) यांची उपस्थिती लाभली.
शिबिरात ६५ बाटल्या रक्त जमा झाले व रक्त संकलन रामभाई शहा ब्लड बँक बार्शी यांनी केले. सेवादल अधिकारी आणि सेवादल यांचे सहकार्य लाभले, कार्यक्रमाची प्रस्तावना राजेंद्र चव्हाण यांनी केली. सर्वांचे आभार शशिकांत शिंदे यांनी तर सूत्रसंचालन विक्रम क्षीरसागर यांनी केले.
Post Views: 21