सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसीचा १८वा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्यास रोटरी प्रांत ३१३२चे प्रांतपाल जयेशभाई पटेल आणि
प्रख्यात तेलुगू सिनेअभिनेते नंदमुरी बाळकृष्ण प्रेरित NBK Helping Hands चे संस्थापक व चेअरमन श्री अनंतपुरम जगन, सहाय्यक प्रांतपाल अतुल सोनी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राष्ट्रगीताने आणि दीप प्रज्वलाने
कार्यक्रमाची सुरुवात झाली.
मावळते अध्यक्ष श्री रमेश कामटम यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. त्यानंतर सचिव श्री काशिनाथ कुंटला यांनी सन 2025-26 या वर्षात क्लबमार्फत राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे सादरीकरण केले.
यावेळी प्रांतपाल जयेशभाई पटेल यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून नरसिंम्हा कनकी व सचिव म्हणून श्रीनिवास नंदाल यांनी पदभार स्वीकारला.
NBK Helping Hands च्या सहकार्यामुळे रोटरीचे सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे राबवता येईल, असा विश्वास नवनियुक्त अध्यक्ष नरसिंम्हा कनकी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.
रोटरी च्या सामाजिक बांधिलकीने मी प्रभावित झालो असून सोलापुरात रोटरी आणि एनबीके हेल्पिंग हँडस संयुक्तपणे एक मोठा आरोग्य शिबिर भरविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात जयेशभाई पटेल यांनी रोटरीमार्फत शिक्षण, आरोग्य, शांतता, पर्यावरण आदी क्षेत्रात जगभर सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. थ्याल्यसेमिया या दुर्धर आजाराविषयी जनजागृती करण्याचे सर्वांना आवाहन केले.
याप्रसंगी क्लबच्या ‘ विझडम’ या मुखपत्राचे अनावरण करण्यात आले.
जनार्दन येमूल, राजेंद्र जागीलम, अनिल आरकाल,जगदीश अरशनपल्ली, हरी बुरा, केशवराज नूती या नूतन सभासदांचे रोटरी पिन देऊन क्लब मध्ये स्वागत करण्यात आले.
नूतन संचालक मंडळाचेसुद्धा स्वागत करण्यात आले.
प्रा. विठ्ठल वंगा यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परशुराम रापेल्ली, अंबादास गड्डम, चार्वाक बुर्गुल, सिद्धेश्वर गड्डम,गणेश इराबत्ती, गोवर्धन चव्हाण, बुचय्या गुंडेटी,श्रीनिवास इट्टम, प्रीती कनकी यांनी परिश्रम घेतले.
यावेळी माजी प्रांतपाल वेंकटेश चन्ना, जनता बँकेचे संचालक पुरुषोत्तम उडता, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, रोटरी सदस्य , संचालक ,एनबीकेचे सोलापुरातील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव श्रीनिवास नंदाल यांनी केले.

















