सोलापूर – अज्ञात कारणावरून एका 34 वर्षीय तरुणाने घरातील छताच्या लोखंडी अँगल ला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नई जिंदगी भागातील टिळक नगरात आज रविवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली .
सोमनाथ नागनाथ माशाळे (वय 34 वर्ष , रा . घर नंबर 315 ,टिळक नगर सोलापूर) असे गळफास घेतलेल्या त्या तरुणाचे नाव आहे.
आज रविवारी सकाळी सोमनाथ हा घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत घरच्यांना आढळून आला . ही खबर एमआयडीसी पोलिसांना समजली असता हवालदार एस एस कांबळे यांनी घटनास्थळी पोहोचून सदरचा मृतदेह इतरांच्या साह्याने खाली उतरून येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दुपारी दीड वाजता दाखल केला.
Post Views: 39