सोलापूर – रिक्षा मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवासी महिलेच्या पर्समधील दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना त्यांना चौक येथे ६ जुलै रोजी दुपारी घडली .दरम्यान या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत रुपाली सोमनाथ अक्कलकोटे ( रा. २५७/६, जुना बोरामणी नाका, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी या सहा जुलै रोजी दुपारी रिक्षा मधून प्रवास करीत निघाल्या होत्या .कन्ना चौक येथील बाकळे कलेक्शन ते तरटी नाका दरम्यान रिक्षामध्ये बसलेल्या अज्ञात महिलेने फिर्यादीच्या पर्स मधून १० ग्रॅमचे सोन्याचे मोहनमाळ, १० ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस असे २ लाख रुपये किमतीचे दागिने चोरुन नेण्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार भद्रशेट्टी हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 19