सोलापूर – दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देऊन गेल्या २० दिवसापासून अन्न त्याग उपोषणास बसलेला थोर समाजसेवक सोनम वांगचुक यांचा समर्थनार्थ करून, केंद्रातील हुकूमशाही मोदी सरकारच्या निषेधार्थ सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट येथे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, व महानगरप्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार दिल्ली येथील जंतर मंतर मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देऊन सोनम वांगचुक यांनी गेल्या २० दिवसापासून अन्न त्याग उपोषण करीत आहेत आंदोलनाला पाठिंबा व केंद्रशासनाच्या निषेधार्थ सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट समोर तीव्र निदर्शने करण्यात आले.
यावेळी शिवसैनिकांनी सोनम वांगचुक आगे बढो-हम तुम्हारे साथ है,शिवसेना जिंदाबाद,उद्धव ठाकरे तुम आगे बढो-हम तुम्हारे साथ है,केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांचा धिक्कार असो,चले जाव चले जाव मोदी-शहा चले जाव,हमसे जो ठकरायेगा-मिट्टी मे मिल जायेगा,अशा घोषणा दिल्या त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रताप चव्हाण व महेश धाराशिवकर आणि विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी नीट पेपर फुटीचा जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करून केंद्र शासनाचा निषेध केले.
यावेळी प्रताप चव्हाण, महेश धाराशिकर,संजय पौळ, कामगार विष्णू कारमपुरी, दत्तात्रय गणेशकर,सुरेश जगताप, संताजी भोळे, अमित भोसले, आसिफ मुल्ला, अशपाक भाई, विशाल सोरेगावकर, बबलू पंडित, विजय जव्हेरी, दत्ता कलाटे, श्रीनिवास बोगा, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, जरगीस मुल्ला, अंबादास चव्हाण, प्रसाद जगताप, आबा सावंत, दीपक दळवी, अजय मळगे, ऋषी दोरकर, रवी नाईक, समर्थ गायकवाड, वजीर शेख,अरुण लोंढे, राजू घाटे, आप्पासाहेब गुंड आदी उपस्थित होते.























