सोलापूर – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार पेठेतील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्रद्धानंद समाज मनाचा श्री आजोबा गणपती येथे ढोल-ताशा वादन सरावाचा शुभारंभ ट्रस्ट अध्यक्ष तथा आमदार विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींची पूजा व ध्वजवंदन करून उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे सहसचिव गंगाधर गवसने, ट्रस्टचे खजिनदार केदार वनारोटे, ट्रस्टचे कार्यकारिणी सदस्य राहुल कुंमणे, विशाल फुलारी, अमित काबणे, सातलिंगप्पा दूधनीकर, श्रीरंग गवई, किसन गर्ज, सोमनाथ मेडके तसेच ढोल-ताशा पथकातील वादक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















