माढा : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवारांना यांच्या जयंतीनिमित्त माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अॅड मिनल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली
प्रियदर्शिनी महिला विकास मंडळ,व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पावसाळी पार्श्वभूमीवर ५०० हून अधिक वारकर्यांना रेनकोट,
फळे, बिस्कीट, औषधे, शाल तसेच महिलांसाठी उपयुक्त वस्तूंचे वाटप आज करण्यात आले.
वारकर्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा मानून , वारकरी संप्रदायाची सेवाभावी वृत्ती अंगीकारत समाजसेवा आणि मानवतेचा संदेश जपण्यासाठी प्रियदर्शनी महिला विकास मंडळ आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे नगराध्यक्षा मिनलताई साठे व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चनाताई राऊत यांनी सांगितले.
या उपक्रमांबद्दल माढावासियांकडून आणि वारकर्यांकडून संयोजकांचे कौतुक केले..
या प्रसंगी उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, सभापती रेश्मा लंकेश्वर, माजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) महिला अध्यक्षा अर्चना राऊत , महिला मंडळाच्या सदस्या अपर्णा मेहता , अरुणा देशपांडे , गीतांजली देशमुख दीपाली गुंड, रेहाना शेख, मालती शहा आदी मान्यवर उपस्थित होत्या.
Post Views: 3