अक्कलकोट : रोटरी क्लब ऑफ अक्कलकोट (RID 3132, क्लब क्र. 67474) यांच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष तसेच संचालक मंडळाच्या पदग्रहण समारंभाचे आयोजन रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.*
या वर्षासाठी रो. संजीवकुमार (सचिन) किरनळ्ळी यांची अध्यक्षपदी, रो. डॉ. प्रमोद सुतार यांची सचिवपदी आणि रो. सागर हळगोदे यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा अक्कलकोट येथील श्रीमंत कांतामती भोसले मंगल कार्यालय, मैंदर्गी रोड येथे संपन्न होणार आहे.
समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून रोटेरियन जयेश पाटील (प्रांतपाल, डिस्ट्रिक्ट ३१३२) उपस्थित राहणार असून, रोटेरियन महेशकुमार कोठारी (उपप्रांतपाल, डिस्ट्रिक्ट ३१३२) यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडणार आहे.
यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे तसेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या पदग्रहण सोहळ्यास रोटरी व रोट्रॅक्ट क्लबचे सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Post Views: 9