यानिमित्त 24 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता दर्गाहच्या प्रांगणात बेसन रोटीचा कार्यक्रम तर रात्री 9 वाजता ‘महफिले नात’चा कार्यक्रम होणार आहे. 25 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता संदलची मिरवणूक पठाणबाग शाहवली पंचकट्टा, लक्ष्मी मार्केट, शालिमार टॉकीज, दत्त चौक, माणिक चौक, हाजीमाई चौक, विजापूर वेस, बेगमपेठ पोलीस चौकी, जिल्हा परिषद, मलंगशाहवली दर्गाहमार्गे निघून रात्री 10 वाजता दर्गाहमध्ये येईल तेथे गिलाफ चढाई, फातेहा सलामनंतर प्रसाद वाटप होईल.
हजरत सुफी अ. वहाब यांच्या अध्यक्षतेखाली ‘महफिले-समा’चा बहारदार कार्यक्रम होणार आहे. 26 जुलै रोजी जश्ने (दीपोत्सव) चिरागचा
कार्यक्रम होईल.रात्री 9 वाजता मौलाना मुफ्ती मोहम्मद तहेसीन रजा (बिहार) यांचे प्रवचन तर 27 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता जियारत, कुराण पठण, शिजरा, फातेहानंतर भाविकांना महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दर्गाहचे खादीम खालीलअहमद अ. लतीफ कादरी व मतीन सय्यद, अहेमद कादरी यांनी केले आहे.



















