अक्कलकोट – जि. प. प्रा.मराठी शाळा घोळसगाव येथे, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक श्री सचिन अप्पासाहेब किवडे यांचेकडून मराठी शाळेस साडे बारा हजार रुपये किमतीचा साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली.
शिक्षण प्रक्रियेमध्ये अधिक परिणामकारकता यावी आणि विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण मिळावे म्हणून शिक्षण प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचे अनन्यसाधारण स्थान आहे याच गोष्टीचे महत्व ओळखून गावातील शिक्षणप्रेमी व्यक्ती श्री सचिन अप्पासाहेब किवडे यांनी शाळेस साऊंड सिस्टीम भेट दिली.
त्यानिमित्त आज दिनांक 22 जुलै 2026 रोजी शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोज माने यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रामेश्वर पाटील, उपाध्यक्ष श्री.रेवणसिद्ध किवडे, गावातील शिक्षणप्रेमी प्रतिष्ठित नागरीक श्री.नरसिंग कोलाटी, श्री उमेश साळुंखे, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री अजित ठाकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. अमोल गुंजोटे, श्री.रामेश्वर दरेकर, श्री.मुरलीधर वागदकर यांनी परिश्रम घेतले.
शाळेला साऊंड सिस्टीम मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते आणि श्री.सचिन किवडे यांच्या दानशूर वृत्तीचे कौतुक होत आहे.