सांगोला – विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिंडी व रिंगण सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला. या सोहळ्याचे प्रस्थान संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी अत्यंत भक्तीभावाने आपल्या खांद्यावर पालखी पेलत घडवून आणले. शिक्षकांचा वारकरी वेषातील उत्स्फूर्त सहभाग, विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध रांगा आणि मध्यभागी फेर धरणारे बाल-विठ्ठल यांच्यामुळे रिंगण सोहळा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. या सोहळ्यासाठी सांस्कृतिक विभागाचे अमोल महिमकर, संध्या तेली यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक उत्तम सरगर, काकासो नरूटे, शुभांगी घोंगडे, नरेंद्र होनराव, प्रा.धनाजी चव्हाण उपस्थित होते.