सोलापूर : “मोठी स्वप्ने पाहण्यासाठी मोठ्या शहरात जन्माला यावे लागते” हा समज सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी मोडून काढला आहे. आज टियर-II शहरातील विद्यार्थीही जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असून, त्यांची ही यशस्वी वाटचाल नागेश करजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑर्किड), सोलापूर येथील स्टडी ॲब्रॉड सेलच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाली आहे.
सन २०२६ मध्ये ऑर्किडमधील विद्यार्थ्यांनी जर्मनी, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम येथील नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळवून सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली आहे.
यंदा यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच कृत्रिम (ए.आय.) बुद्धिमत्ता व माहिती विज्ञान शाखांतील विद्यार्थ्यांना युरोपमधील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला आहे. हे विद्यार्थी मेकॅट्रॉनिक्स, कृत्रिम (ए.आय.) बुद्धिमत्ता, डाटा सायन्स, रोबोटिक्स, एअरोस्पेस अभियांत्रिकी, बिग डाटा विश्लेषण, डिजिटल माध्यम व्यवस्थापन आणि शाश्वत तंत्रज्ञान व्यवस्थापन यांसारख्या भविष्याभिमुख अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणार आहेत.
या यशामध्ये मयुर काटगांवकर, विशाल मसणे, लक्ष्मी चिंता, जयशंकर डोणगे, समर्थ पवार, वंशिका पाटील, शुभम बोल्लू, तेजस मल्लाडे आणि वैष्णवी माशाळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या यशाने सोलापूरमधील अनेक विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाची नवी प्रेरणा निर्माण केली आहे.
ऑर्किडचा स्टडी ॲब्रॉड सेल विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासूनच परदेशातील उच्च शिक्षणाची तयारी करून देतो. विद्यापीठ निवड, उद्देशपत्र (SOP), शिफारसपत्र (LOR), इंग्रजी प्राविण्य परीक्षा, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, व्हिसा, मॉक मुलाखती आणि करिअर नियोजन यांसह प्रत्येक टप्प्यावर तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परदेशात शिक्षण घेण्याचा प्रवास अधिक सुलभ आणि यशस्वी ठरतो.
महाविद्यालयाचे फ्रान्स, जर्मनी आणि इतर युरोपियन विद्यापीठांशी असलेले शैक्षणिक सहकार्य, विद्यार्थी देवाण-घेवाण कार्यक्रम, संशोधन प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप यांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक उद्योग, संशोधन संस्था आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे.
आजपर्यंत 90 हून अधिक विद्यार्थ्यांनी ऑर्किडच्या स्टडी ॲब्रॉड सेलच्या माध्यमातून जर्मनी, फ्रान्स, युनायटेड किंगडम, अमेरिका, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवला आहे. अनेक माजी विद्यार्थी आज जागतिक कंपन्या, संशोधन संस्था आणि उद्योगांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यामुळे “ऑर्किडमध्ये प्रवेश म्हणजे केवळ अभियांत्रिकी पदवी नव्हे, तर जागतिक करिअरकडे टाकलेले पहिले पाऊल” ही ओळख अधिक दृढ होत आहे.
बारावीनंतर अभियांत्रिकी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑर्किड हे केवळ शिक्षण देणारे महाविद्यालय नसून, परदेशातील उच्च शिक्षण, जागतिक संशोधन, आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील करिअरची संधी उपलब्ध करून देणारे सक्षम व्यासपीठ ठरत आहे.
या यशासाठी डॉ. श्रीनिवास एस. मेतन (उपप्राचार्य व स्टडी ॲब्रॉड सेल प्रमुख), सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग तसेच स्टडी ॲब्रॉड सेलच्या समन्वयकांचे विशेष मार्गदर्शन लाभले. संस्थेचे विश्वस्त, प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास एस. मेतन, उपप्राचार्य डॉ. व्ही. के. पत्की तसेच सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
चौकट : *दुसऱ्या वर्षापासून जागतिक करिअरची तयारी*
ऑर्किडचा स्टडी ॲब्रॉड सेल विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून परदेशातील उच्च शिक्षणासाठी नियोजनबद्ध तयारी करून देतो. विद्यापीठ निवड, इंग्रजी प्राविण्य परीक्षा, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, व्हिसा, मॉक मुलाखती, संशोधन प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप यांसाठी सातत्यपूर्ण मार्गदर्शन दिले जाते. आजपर्यंत 90 हून अधिक विद्यार्थ्यांनी या सेलच्या माध्यमातून जागतिक विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवला असून, अनेक माजी विद्यार्थी आज जगभरातील नामांकित कंपन्या व संशोधन संस्थांमध्ये कार्यरत आहेत.
*– डॉ. श्रीनिवास एस. मेतन*
उपप्राचार्य (करिअर डेव्हलपमेंट), स्टडी ॲब्रॉड सेल प्रमुख व
परदेशी विद्यापीठ समन्वयक, ऑर्किड, सोलापूर
Post Views: 16