पंढरपूर – आषाढी एकादशीचा अनुप्यम सोहळा याचि देही,याचि डोळा अनुभवण्यासाठी लाखोंच्या संख्येने वैष्णव येथे दाखल झालेलेआहेत. विठुरायांची पदस्पर्श दर्शनाची रांग संपुर्ण पत्राशेड भरुनपुढे गोपाळपूर रस्त्यावर गेलेली आहे. संत ज्ञानदेव आणि संत तुकोबारायांच्यापालख्यांचे शुक्रवारी दशमी दिवशी सायंकाळच्या सुमारास शहरात आगमन झाले आहे. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठीमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस हे सपत्नीक येथे दाखल झालेले आहेत. वारकरी संप्रदायातील कुंभमेळा म्हणून ज्या आषाढी यात्रेकडे पाहिले जाते त्या यात्रेतील प्रमुख दिवस असलेला एकादशीचा उत्सव अवघ्या काही तासांवरयेवुन ठेपलेला आहे. या सोहळ्या मध्ये सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारील कनार्टक, आंध्र,तेलगंणा आणि मध्यप्रदेश आदी राज्यातून वारकरी भाविक येथे रेल्वे,एसटी तसेच खासगी वाहनांमधून दाखल झालेले आहेत. शहरातील मठ, धर्मशाळा तसेच मोठ्यावाड्यांमधून आणि चंद्रभागेच्या विस्तर्ण पसलेल्या वाळवंटात तसेच पासष्ठ एकर परिसरातभजन, कीर्तन आणि प्रवचनांमध्ये भाविक दंग झालेले दिसत आहेत.बोला पुडंलिक वरदे हरि विठ्ठलाच्या जयघोषामुळे अवघी पंढरीनगरी भक्तीमयझाली असून टाळ, मृदुंगाच्या गजरात दुमदुमुन गेली आहे.
शहरातील प्रमुख समजला जाणारा विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर,स्टेशन रस्ता, नगरप्रदक्षिणा मागार्वर प्रासादिक वस्तु, सोलापूर चादरी, घोंगडी, फोटोफ्रेम, देवतांच्या धातूच्या मुर्ती अशा दुकानांमधून भाविकांची गर्दी झालेली दिसत आहे. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत भाविकांना मंदिर समितीच्या वतीने निर्मळ, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय केलेली आहे. या बरोबरच पत्राशेड मधील पदस्पर्शदर्शन रांगेतील गाळ्यांमधून भाविकांना चिखल तसेच खडीचा त्रास होवू नये म्हणून मँट(मऊचटई) अंथरण्यात आलेली असून स्वच्छ पिण्याच्या पाण्याबरोबरच पंखे, कुलर तसेच अनेक ठिकाणी भाविकांना बसण्याची देखील सोय करण्यात आलेली आहे.
—————————–
-चौकट : ( पालखी सोहळे पंढरीत दाखल)
दरम्यान शुक्रवारी (ता.२४) सायंकाळी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यांचे शहरात आगमन झालेले आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे पंढरीनगरीत वैष्णवांचा अथांग महासागर वाहत असल्याची जणू अनुभुती येत आहे. शहरातील सर्व रस्ते भाविकांच्या गदीने फुलून गेलेले आहेत. पोलिस प्रशासनाने रस्त्यांवर अतिक्रमणे होवू देण्याचे कटाकक्षाने टाळल्यामुळे स्वच्छंदपणे मोकळा श्वास घेणाऱ्या रस्त्यावरुन भाविकांना देखील चालणे सुखकर झालेले आहे. रस्ते मोकळे झालेले असले तरी भाविकांच्या गदीर्मुळे माऊलीमाऊली म्हणत वारकरी गदीर्तून वाट काढीत पुढे जाताना दिसत आहेत.
—————————
चौकट : (शहराला पोलिसी छावणीचे स्वरुप)
आषाढी यात्रा निविघ्नपणे पार पाडावी म्हणून दरवर्षीमोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त मागविण्यात येत असतोच. या वर्षी देखील मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.त्यामुळे शहराच्या विविध भागात जिकडे पहावे तिकडे पोलिस बंदोबस्त दिसतआहे. त्यामुळे शहराला सध्या पोलिसी छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे
Post Views: 11