सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे २९ ऑगस्ट रोजी भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागामार्फत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना ‘अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कार’ प्रदान केले जाणार आहेत.
क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, उत्कृष्ट क्रीडा पत्रकारिता आणि शा.शि.अध्यापक-संचालक या श्रेणींमधील पुरस्कारांसाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पुरस्काराची सविस्तर नियमावली विद्यापीठाच्या
www.sus.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज विहित नमुन्यात १० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाकडे हस्तदये सादर करावेत. अर्जावर व लिफाफ्यावर कोणत्या पुरस्कारासाठी अर्ज केला आहे याचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असून, मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी कळविले आहे.
Post Views: 12