सोलापूर – चतुरबाई श्राविका विद्यालयात आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला मुख्याध्यापिका राखी देशमाने मॅडम व सर्व शिक्षकांनी श्री विठ्ठल व रुक्मीणी मुर्तीचे व पालखीचे पूजन केले. त्यानंतर संताच्या वेशातील मूली वारकरी त्यानंतर वारकरी वेशातील मुले असे गट करून १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांची दिंडी श्राविका शाळा ते बाळीवेस कस्तुरबा मार्केट ते सम्राट चौक व पुन्हा श्राविका चौक असे पालखीचे व दिंडीचे गमन करण्यात आले
विद्यार्थ्यांनी टाळमृदंगाच्या गजरात उत्साहाने पालखीमध्ये सहभाग घेतला.
इयत्ता १ ली चे विद्यार्थी यांनी प्राणी व पक्षी यांची वेशभूषा धारण केली होती. इ २ री ते ४ थी मुलांनी संत वारकरी यांचा वेश परिधान केला व मुलींनी डोक्यावर तुळस घेतला व उर्वरित इयत्ता ३ री व ४थी च्या विदयार्थ्यांनी निसर्गाचे रक्षण, पाणी व वीज जपून वापर तसेच प्लास्टिक वापर बंदी आदींच्या घोषणा दिल्या व हरिनामाचा जप केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
——-
Post Views: 8