सोलापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव-२०२६ शांततेत व कायदेशीर चौकटीत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पोलीस आयुक्तालयात शांतता समितीची संयुक्त बैठक झाली. यावेळी पोलीस अधिकारी, महापालिका, महावितरण, आरटीओ, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, उत्सव मंडळांचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य व पत्रकार उपस्थित होते.
बैठकीत १ ते ९ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या उत्सवानिमित्त मंडळांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करणे, ध्वनीप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे, सीसीटीव्ही व्यवस्था करणे, अधिकृत वीजजोडणी घेणे, सामाजिक संदेश देणारे देखावे उभारणे, तसेच मिरवणुकीत सुरक्षिततेचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी उत्सवादरम्यान कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नसल्याचे स्पष्ट करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, कायद्याचे उल्लंघन टाळण्याचे आणि अनुचित प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीस पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) वृष्टी जैन, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर ,सहा पोलीस आयुक्त विभाग-२, श्रीमती कुर्री , सहा. पोलीस आयुक्त (शवाशा) खिरडकर, सहा पोलीस आयुक्त दिलीप पवार (गुन्हे शाखा),श्री यादव, सहा पोलीस आयुक्त (नियंत्रण कक्ष) सहा पोलीस आयुक्त देवकर (विशेषशाखा) तसेच सोलापूर महानगरपालिका कडील एस.ए.हिबारे, महावितरण अभियंता गायडे, सोलापूर अग्नीशामक दलाचे समीर पाटील, धर्मादाय आयुक्त कार्यालय कडील उमेश देशमुख तसेच सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार, व शांतता कमिटीचे सदस्य, व पत्रकार बंधु उपस्थित होते.
Post Views: 10