अक्कलकोट – विद्यार्थी, विद्यार्थिनी शालेय जीवनात व्हाट्सअप, ट्विटर, फेसबुक, मेसेजेस, इंस्टाग्राम या सोशल मीडियापासून लांब राहून भ्रमणध्वनीचा वापर करू नये ,सायबर क्राईम पासून सावध राहून आर्थिक व्यवहारापासून दूर राहावे, तसेच बालविवाह पासून लांब राहून मुलीने 18 वर्षे ,मुलांनी 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह बंधनात अडकु नये, असे प्रतिपादन अक्कलकोट विभागाचे निर्भय पथकातील महिला पोलीस अंमलदार सौ, नीता बिराजदार ,सौ ,रेणुका कोळी, सौ मनीषा चिंचोळकर व श्री पोलीस हवालदार श्री, आसिफ मोमीन यांनी नागणसूर येथील एच,जी, प्रचंडे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांना केली, कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी प्राचार्य शंकर व्हनमाने होते ,कार्यक्रमाचे स्वागत प्रस्तावना ज्येष्ठ शिक्षिका सौ सुनीता बंदीछोडे यांनी केली ,याप्रसंगी व्यासपीठावर प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक संजयकुमार गंगदे ,सोमशेखर कळसगोडा ,पोलीस हवालदार श्री असिफ मोमीन, महिला पोलीस हवालदार सौ नीता बिराजदार, सौ रेणुका कोळी, सौ मनीषा चिंचोळकर हे होते, याप्रसंगी निर्भय पथकातील अधिकारी मार्गदर्शन करताना म्हणाले की, पोस्को कायदा, 112 व 1930 डायल च्या संदर्भात मार्गदर्शन केले, तसेच मुला-मुलींनी स्वतःचे चारित्र्य सांभाळावे ,ट्रिपल सीट ने टू व्हीलर ने प्रवास करू नये, या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले, या कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेबी प्रचंडे ,अजय पाटील, स्टीवन डल्लू, थावरू चव्हाण, विश्वनाथ तळवार, नितीन धा नशेट्टी, आकाश कोनापुरे, माणिक बिराजदार ,अर्चना मनुरे आदींनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी आयेशा पटेल हिने केले ,व सर्व उपस्थित आमचे आभार संजयकुमार गंगदे यांनी मानले,



















