बार्शी – एम आय टी व्ही जी एस शाळा, बार्शीच्या प्राचार्या श्रीमती रेखा दिलीप पाटील यांच्या प्रभावी नेतृत्वाची आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य – राष्ट्रीय मानांकित प्राचार्य पुरस्कार’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच सोहळ्यात शाळेच्या शिक्षकवृंदाला ‘सर्वोत्कृष्ट शाळा – तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम शिक्षक पुरस्कार २०२६’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
पीआय मीडिया सोल्युशन्स यांच्या वतीने पुणे येथे आयोजित ‘शिक्षण नेतृत्व परिषद – ७ वी आवृत्ती’मध्ये हा सन्मान प्रदान करण्यात आला. प्राचार्या रेखा पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली एमआय टी व्ही जी एस शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण अध्यापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे सातत्याने प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे.
प्राचार्या रेखा पाटील यांना मिळालेला सन्मान त्यांच्या समर्पित कार्याची व प्रेरणादायी नेतृत्वाची पावती असून, शिक्षकवृंदाला मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या तंत्रज्ञानाधिष्ठित आणि नाविन्यपूर्ण अध्यापनाचा गौरव आहे.
या दुहेरी यशाबद्दल एमआय टी व्ही जी एस शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व प्रशासकीय कर्मचारी यांच्यावतीने प्राचार्या रेखा पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.