Friday, August 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जीर्ण दप्तर जतन करा, शासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : पृथ्वीराज माने

तरुण भारतbyतरुण भारत
August 14, 2026
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर –        जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपंचायतींमध्ये वर्षानुवर्षे जतन केलेली जन्म-मृत्यू नोंदणी तसेच अन्य महत्त्वाची जुनी कागदपत्रे जीर्ण होत असल्याने त्यांचे तातडीने स्कॅनिंग करून डिजिटल स्वरूपात जतन करावे. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक इमारतींबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने यांनी सर्वसाधारण सभेत केली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील जनरल रजिस्टर, अंगणवाडीतील जन्मनोंदणी रजिस्टर तसेच ग्रामपंचायतींमधील जन्म-मृत्यू नोंदणीची जुनी रजिस्टर सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. सातत्याने हाताळणी होत असल्याने अनेक रजिस्टरची पाने फाटत असून, महत्त्वाच्या नोंदी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच अन्य शासकीय कामांसाठी जुन्या नोंदींची आवश्यकता भासते. मात्र, नोंदी शोधताना कागदांचे तुकडे पडत असल्याने नागरिकांना आवश्यक पुरावे उपलब्ध होत नसल्याचे माने यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
महसूल विभागाच्या धर्तीवर या सर्व जुन्या दप्तरांचे सर्वेक्षण करून जीर्ण रजिस्टरचे स्कॅनिंग व डिजिटल जतन करावे. त्यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी काही शाळांमधील रजिस्टरची दुरवस्था त्यांनी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
बबलाद दुर्घटनेनंतर इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील शाळेच्या व्हरांड्याचा स्लॅब कोसळून विद्यार्थी व शिक्षक जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर माने यांनी जिल्ह्यातील शासकीय इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. केवळ दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाने जागे होण्याऐवजी संभाव्य धोके आधीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शाळांबरोबरच अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पशुवैद्यकीय केंद्रे, सभामंडप, समाजमंदिरे, अभ्यासिका आणि अन्य शासकीय निधीतून उभारलेल्या इमारतींचेही स्ट्रक्चरल ऑडिट करावे. गाव, वाडी-वस्ती आणि तांडा पातळीवरील सर्व शासकीय इमारतींची तपासणी करून विभागनिहाय अहवाल तयार करावा. धोकादायक आढळलेल्या इमारतींच्या दुरुस्ती, पुनर्बांधणी किंवा पाडकामाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
आठ प्रमुख अधिकारीपदे रिक्त; प्रशासनावर कामाचा ताण
जिल्हा परिषदेचे प्रशासकीय कामकाज आणि विविध शासकीय अभियानांतील कामगिरीचे कौतुक करतानाच माने यांनी रिक्त पदांचा गंभीर प्रश्नही मांडला. प्रमुख विभागांतील आठ अधिकारीपदे रिक्त असल्याने उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन), कार्यकारी अभियंता (बांधकाम-२), ग्रामीण पाणीपुरवठा, लघु पाटबंधारे, पाणीपुरवठा व स्वच्छता, समाजकल्याण अधिकारी, शिक्षणाधिकारी (योजना) आणि दिव्यांग अधिकारी ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. याशिवाय विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
रिक्त अधिकारी-कर्मचारी पदे तातडीने भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून प्रभावी पाठपुरावा करावा, अशी मागणी पृथ्वीराज माने यांनी केली. जुने दप्तर डिजिटल स्वरूपात जतन करणे, शासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि रिक्त पदांची भरती या तीन मुद्द्यांद्वारे प्रशासनाने भविष्यातील धोके आणि नागरिकांच्या अडचणी टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असा आग्रह त्यांनी सभागृहात धरला.
Post Views: 8
Previous Post

अस्मिता खेलो इंडिया पुणे विभागीय वुशू लिग स्पर्धा : सोलापूर ग्रामीण दोन प्रकारात उपविजयी

Next Post

जामश्री सिटी येथील कॉन्प्लेक्स सिनेमा गृहाचे थाटात उदघाटन 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
जामश्री सिटी येथील कॉन्प्लेक्स सिनेमा गृहाचे थाटात उदघाटन 

जामश्री सिटी येथील कॉन्प्लेक्स सिनेमा गृहाचे थाटात उदघाटन 

ताज्या बातम्या

हातात तिरंगा घेऊन मार्कंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह आईशक्ती फाउंडेशनतर्फे तिरंगा यात्रा #news

August 14, 2026

लोकप्रतिनिधी ,अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘हर घर तिरंगा’साठी ध्वजवाटप

August 14, 2026
संत सावता माळी विद्यालयाचा ५४ वा वर्धापन दिन साजरा

संत सावता माळी विद्यालयाचा ५४ वा वर्धापन दिन साजरा

August 14, 2026
शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने तिरंगा रॅली

शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने तिरंगा रॅली

August 14, 2026

रोटरी क्लब मोडनिंब (ता. माढा) यांच्या वतीने सोलंकरवाडी येथे वृक्षारोपण

August 14, 2026
इंद्रभूवन व कौन्सिल हॉलवर तिरंगा आकर्षक विद्युत रोषणाई 

इंद्रभूवन व कौन्सिल हॉलवर तिरंगा आकर्षक विद्युत रोषणाई 

August 14, 2026
लायन्स क्लब बार्शी राॅयल व लायन्स क्लब बार्शी युनिकाच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन

लायन्स क्लब बार्शी राॅयल व लायन्स क्लब बार्शी युनिकाच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन

August 14, 2026
द प्लॅटिनो अपार्टमेंटमधील इलेक्ट्रिक वायर चोरीचा गुन्हा उघड – पावणे ७ लाखाचा मुद्देमाल जप्त 

द प्लॅटिनो अपार्टमेंटमधील इलेक्ट्रिक वायर चोरीचा गुन्हा उघड – पावणे ७ लाखाचा मुद्देमाल जप्त 

August 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1060665

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!