सोलापूर – कॉनप्लेक्स सिनेमाजतर्फे सोलापुरात ‘कॉनप्लेक्स लक्झुरियन्स’च्या लाँचिंगसह अति-आलिशान चित्रपट सोलापूरकरांना एकाच ठिकाणी ४ प्रीमियम स्क्रीन , २५३ जागा (सीट्स) | ऑल-रिक्लायनर ऑडिटोरियम , ड्युओ-लाउंजर्स , पेटंटेड स्पेक्ट्रा-एक्स तंत्रज्ञान सोलापूर करांना अनुभवाला मिळणार आहे. भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या सिनेमासाखळ्यांपैकी एक असलेल्या ‘कॉनप्लेक्स सिनेमाज’ (Connplex Cinemas) मुळे सोलापूरच्या वैभवात भर पडली असल्याचे मत जामश्री रियाल्टीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश दमाणी यांनी व्यक्त केले.
जामश्री सिटी येथील चार कॉन्प्लेक्स सिनेमा गृहाच्या उदघाटन प्रसंगी दमाणी हे बोलत होते.
यावेळी कॉन्प्लेक्स सिनेमाचे व्यवस्थापकीय संचालक अनिश पटेल व राजेश दमाणी यांच्या हस्ते फीत कापून सिनेमागृहाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर प्रिया दमाणी , अंकित दमाणी, श्रेयसी दमाणी, आयुष दमाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी प्रिसिजनचे यतीन शहा, डॉक्टर सुहासिनी शहा, उद्योजक किशोर चांडक , दत्ता सुरवसे , ब्रिजेश गांधी , मेहुल पटेल , केतन शहा , संदीप देसाई , पंकज शहा, विजय जाधव , अशोक परमार ,राजीव देसाई , डॉ. राजीव प्रधान , जयेश पटेल , रणजित देसाई , राजेंद्र गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.
Post Views: 7