मोडनिंब – रोटरी क्लब मोडनिंब (ता. माढा) यांच्या वतीने राजगे ताकतोडे मोरे वस्ती सोलंकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर वृक्ष रोपण संपन्न झाले. यावेळी एक पेड मा के नाम या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांना रोप देण्यात आले आणि त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी तेथील विद्यार्थी /शिक्षक वर्ग यांनी घेतली. याप्रसंगी रोटरी क्लब अध्यक्ष अनिल शिंदे, सचिव डॉ प्रशांत कोल्हे,माजी अध्यक्ष तथा उद्योजक निलेश गिड्डे ,प्रमोद माळी पत्रकार प्रथमेश पवार , शहाजी यादव, अरविंद मोरे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. तर आभार नागेश आवारे यांनी मानले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















