बार्शी – येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग, एनएसएस आणि एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने ८० वा स्वातंत्रदिन निर्मित्ताने तिरंगा रॅली काढण्यात आली.
तिरंगा रॅलीचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. विजयानंद निंबाळकर, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. दामाजी भिसे, प्रा. समाधान लोंढे, डॉ. आसवरी फरताडे, डॉ. मनोज चिकराम, प्रा. आरती पवार, डॉ. रामहरी नागटिळक, डॉ. हरिदास बारसकर, प्रा. रविंद्र वायकर, डॉ. महादेव राऊत, प्रा. राजेश भोसले, डॉ. श्रीराम वैद्य, प्रा. किशोर गरड, प्रा. विजयकुमार सोनवणे, डॉ. रणजित पाटील आदी उपस्थित होते.
ही रॅली श्री शिवाजी महाविद्यालय- महाराष्ट्र बँक-बार्शी पंचायत समिती- तहसिल कार्यालय- पाटील प्लॉट मार्गे काढण्यात आली. याप्रसंगी वंदे मातरम्, भारतमाता की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र, खेळाडू आणि विद्यार्थीं बहुसंख्येने उपस्थित होते.
Post Views: 4