अरण – मुलांनो स्वप्ने मोठी ठेवा, ध्येय प्राप्तीपर्यंत त्याचा पाठलाग करा शिक्षणाच्या नवनवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत त्या सर्व संधीचा योग्य प्रकारे फायदा घेऊन आपल्या आयुष्याला आनंददायी बनवा. अमेरिकेतील परदेश अभ्यास दौऱ्यातील अनेक प्रसंगांचे वर्णन त्यांनी केले व विद्यार्थ्यांना अमेरिकेमध्ये शेतीत होणारे प्रयोग याविषयी संत सावतामाळी विद्यालय अरण येथे विद्यालयाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना आमदार अभिजीत पाटील यांनी माहिती दिली.
शिक्षण प्रसारक मंडळ अरण,संचलित संत सावता माळी विद्यालय, अरण ५४ व्या वर्धापन माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिजीत आबा पाटील, संजय बाबा कोकाटे, डॉक्टर मृदुला तळेकर, बाळासाहेब भरणे पोलीस निरीक्षक, पंचायत समिती सदस्य प्राजक्ता प्रतापसिंह पाटील, डॉक्टर निशिगंध कोल्हे मॅडम, सरपंच शरद मोरे, मा.हरिदास रणदिवे सर,कृषी तज्ञ मनोज शहा अरण च्या सरपंच सुरत्नप्रभा ताकतोडे, संस्थेचे कार्याध्यक्ष भारत आबा शिंदे सचिव एस डी कुलकर्णी सर संचालक कवी सावता घाडगे सर, पुष्पा गुळवे मॅडम, बालाजी पाटील,संभाजी काळे,यशवंत दादा शिंदे विद्यालयाचे प्राचार्य सुहास माळी सर, पर्यवेक्षक अंकुश चोपडे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख सावता घाडगे सर उपस्थित होते. संजय कोकाटे, समाजसेवक मनोज शहा, मृदुला तळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी वार्षिक पारितोषिक वितरणामध्ये शैक्षणिक, कला, क्रीडा, शिष्यवृत्ती व वक्तृत्व स्पर्धा यांची पारितोषिके वितरित करण्यात आली. एकूण 53 हजार रुपयाची रोख पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश घाडगे व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक अंकुश चोपडे यांनी केले.
Post Views: 8