उत्कर्ष सार्वजनिक वाचनालय, कर्णिक नगर व एकतानगर ज्येष्ठ नागरिक संघ व तेलुगु मराठी साहित्यिक संस्था, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. डाॅ.सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन नारळ वाढवून व भारतीय तिरंगा पडकवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कवी संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र गुंडेली, प्रमुख पाहुणे दस्तगीर जमादार व प्रमुख उपस्थिती म्हणून दत्तात्रय इंगळे यांची होती. कार्यक्रमाचे संयोजन उत्कर्ष वाचनालयाचे अध्यक्ष तुळशीदास जाधव, उपाध्यक्ष गोपीकृष्णा वड्डेपल्ली, सचिव थावरू राठोड, कोषाध्यक्ष बजरंग कुलकर्णी, सहसचिव रवींद्र पाटील,प्रा.अशोक काजळे ,ग्रंथपाल नरसिंह मिसालोलू व सर्व सदस्य यांनी केले. सदरच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर कविता सादर करून स्वातंत्र्याच्या आठवणी जागृत करण्यात आल्या. कवी नरेंद्र गुंडेली, राजेंद्र भोसले, गोविंद काळे ,दत्तात्रय इंगळे, संतोष जाधव, प्रियांका महिंद्रकर,राजेंद्र दंदे ,मदन जवळगेकर, मुक्तेश्वर मुळे, रेश्मा आझाद पाटील, जावेद शेख,चंद्रप्रकाश यनगुंडी ,नागेंद्र माणेकरी, जमालोद्दीन शेख, प्रतिभा गडेकर दंदे, विठ्ठल टाक, बालाजी गोप, बबलू चिंता, सुरेश येमूल, संस्कृती कांबळे व ओगन्ना देवनपल्ली इत्यादी कवींनी तेलुगु मराठी कविता सादर केल्या.प्रमुख पाहुणे दस्तगीर जमादार यांनी आपल्या मनोगतात कवी हा कमी शब्दात ओघवत्या शैलीने आपली प्रतिभा व्यक्त करतो असे मत मांडले.अध्यक्षीय समारोपात नरेंद्र गुंडेली यांनी वाचनालयाची विपुल ग्रंथसंपदा असल्यामुळे येथील वाचनसंस्कृती वाढलेली आहे.तसेच सर्व कवींनी आपल्या कविता अतिशय चांगल्या पद्धतीने सादरीकरण केलेल्या आहेत,असे मत व्यक्त केले.सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश कंदीकटला, गंगाधर गुल्लापल्ली व रवी केने यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र गुंडेली यांनी केले तर आभार दत्तात्रय इंगळे यांनी मानले.सदरच्या कार्यक्रमात कर्णिक नगर व एकतानगर परिसरातील बहुसंख्य वाचक व रसिक श्रोते उपस्थित होते.
Post Views: 10