सोलापुर : दिनांक २३/०९/२०२६ रोजी गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात सुप्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ सौ सुजाता राघवेंद्र कुलकर्णी यांनी महिला आरोग्य समस्यांच्या संदर्भात श्री गणेश हनुमान भक्त तरुण मंडळाच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला. “विषय मेनोपॉज (रजोनिवृत्ती)” गणेश मंदिर कटयावर लहान मुलामुलींची संख्या जास्त असल्या कारणाने आपल्या मधुर वाणीने समजणा-या भाषेत आहाराविषयी लहान मुलांना माहिती दिली. मुलांना आहाराविषयी चांगल्या प्रकारे प्रबोधन करुन त्या म्हणाल्या आता इथं तुमच्या मम्मी आल्यात ना! मग त्यांची तब्येत तुमच्यासाठी चांगली असायला हवी ना, मुलं म्हणाली हो – -. मग चला बर आता तुम्ही खेळायला असे गोड बोलुन मुलाला कटवुन स्त्रियांना मेनोपॉज (रजोनिवृत्ती) या विषयी माहिती सांगीतली.
त्या म्हणाल्या वय वर्षे ५२ ते ५५ या काळात पाळी बंद झाल्यानंतर हृदयाशी निगडीत असलेल्या समस्या निर्माण होतात. महिलांमध्ये मासिक पाळी बंद झाल्यानंतर या सोबत इस्ट्रोजन हार्मोन हळुहळु कमी होत जातात. त्याचा स्तर बदलल्याने आरोग्य प्रभावित होते. आणि रजोनिवृत्ती पुर्व शरीरात इस्ट्रोजनचा स्तर अधिक असतो. त्यामुळे धमन्यांना कोणताही अधिक धोका नसतो. जेंव्हा इस्ट्रोजनचे उत्पादन कमी होते तेंव्हा सुरक्षिततेची हमीही कमी होते. अशा वेळी हृदयविकारांचा धोका अधिक संभवतो. यासाठी महिलांनी काळजी घेणं गरजेचं आहे. त्या असंही म्हणाल्या आहार, विहार आणि व्यायामही करणं गरजेचं आहे. आहारामध्ये फळं, फळभाज्या, कडधान्याचा समावेश करणे गरजेचं असतं. सोयाबीन पासुन बनवलेल्या पदार्थांचा वापर अधिक करा. स्निग्धयुक्त आणि चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळा. आणि वजन नियंत्रणातच ठेवा. आहारामध्ये पथ्य पाळा. रजोनिवृत्ती नंतर वजन वाढुन स्थुलता येते. त्यासाठी रोज ४० मिनिटे अधिक वेगाने पायी चाला. फिरण्याने व्यायाम होतो. सायकलिंग, स्विमिंग केल्याने शरीर सदृढ राहील. महिलांना पाळी जाण्याच्या मार्गावर आणि पाळी गेल्यानंतर घ्यावयाची काळजी या संदर्भात त्यांनी उत्तमरीत्या मार्गदर्शन केले. प्रबोधन केले. ब-याचशा महिलांनी यावेळी या संदर्भात त्यांच्या शंका कुशंका विचारुन त्यांच्याकडुन शंकेचे निरसन करुन घेतले.
Post Views: 22