सोलापूर : विश्वशांती, मानवकल्याण आणि चांगला पाऊस पडावा, या संकल्पनेतून ड्रीम फाउंडेशन परिवार, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी गट, राजमाता जिजाऊ महिला मंच, चाणक्य गुरुकुल आणि श्री सिद्धेश्वर कृषी पर्यटन केंद्र यांच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांमध्ये विशेष जलाभिषेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्रघोषात ५१ नद्यांचे पवित्र जल, ५१ पवित्र कुंड व तीर्थक्षेत्रांचे जल, नऊ ज्योतिर्लिंग तसेच विविध पवित्र सरोवरांतील जलाने शिवलिंगांचा अभिषेक करण्यात येणार आहे, अशी माहिती
संकल्पक काशिनाथ भतगुणकी यांनी दिली. दर वर्षी 22 मार्च जागतिक जल दिनी राष्ट्रीय जल साक्षरता संमेलन घेण्यात येते यंदा 51 नदी जल संकलन व जलाभिषेक संकल्प श्री राम रेड्डी उद्योजक बालाजी उद्योग समूह यांच्या प्रेरणेने घेण्यात आले असून ते पूर्णत्वास आले आहे जल संकलन साठी संगीता भतगुणकी, पंडितराव लोहकरे गुरुजी,श्री पाटील वकील, सौ गजराबाई गुरुशांत भतगुणकी,श्री सतीश पाटील,श्री शाम जाधव यांचे सहकार्य लाभले आहे
या उपक्रमासाठी १५ मार्च ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत देशाच्या दक्षिण ते उत्तर आणि पूर्व ते पश्चिम भागातील विविध पवित्र स्थळांहून जलसंकलन व कन्याकुमारी येथील त्रिवेणी संगम बंगालचा उपसागर,हिंद महासागर अरबी समुद्र पवित्र जल संकलन करण्यात आले आहे तसेच त्र्यंबकेश्वर येथील महाकुंभ कुशावर्त कुंड, नाशिक येथील रामकुंड, कुरुक्षेत्र येथील ब्रह्मसरोवर, अजमेर-पुष्कर येथील ब्रह्मा मंदिराचे जल, खाटू शाम कुंड, गोवर्धन येथील राधा कुंड,रामेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील २२ कुंडांचे जल यासह विविध तीर्थक्षेत्रांतील पवित्र जल संकलित करण्यात आले आहे.
१५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दररोज पहाटे ५ ते ७ या वेळेत प्रमुख मंदिरांमध्ये जलाभिषेक केला जाणार आहे. या उपक्रमाचे संकल्पक काशिनाथ भतगुणकी आणि परिवार आहेत.
उपक्रमासाठी बालाजी उद्योग समूहाचे उद्योजक राम रेड्डी, रमेश बिराजदार आणि बसनिंगप्पा हिपरगे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.
या मंदिरांमध्ये होणार जलाभिषेक
विश्वरूप शिवलिंग हत्तरसंग कुडल येथून सुरू 15 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे 5 वाजता होणार असून 21 दिवसात 21 मंदिरात 51 पवित्र नदी जल व 51 पवित्र कुंड मधील पवित्र जल अभिषेक श्री काशिनाथ भतगुणकी परिवार तर्फे करण्यात येणार आहे समारोप 6 नोव्हेंबर 2026 रोजी श्री जागृत मारुती मंदिर हत्तरसंग येथे आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रम श्री अदृश्य काडसिधेश्वर स्वामीजी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे यावेळी शेतकरी,युवक व महिलांना कृषी व अध्यात्मिक मार्गदर्शन श्री जागृत मारुती मंदिर समिती व समस्त ग्रामस्थ हत्तरसंग कुडल तर्फे करण्यात येणार आहे,
21 दिवसात विविध मंदिरात जल अभिषेक होणार असून यामध्ये श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर, श्री सिद्धेश्वर मंदिर, श्री मार्कंडेय महामुनी महाराज मंदिर, श्री रूपाभवानी माता मंदिर, श्री पंचलिंग परमेश्वर मंदिर, Svcs संस्था अक्कलकोट रोड,श्री स्वामी समर्थ मंदिर,अक्कलकोट, श्री सिद्धारूढ शरण मठ,अक्कलकोट, श्री परमेश्वर मंदिर वागदरी, श्री जागृत मारुती मंदिर गौडगाव, श्री काशी विश्वेश्वर मंदिर जेऊर, श्री तुप्पीन मठ नागणसूर, श्री सोमेश्वर मंदिर, हतुर,श्री महालिंगेश्वर मंदिर, हत्तरसंग श्री संगमा देवी मंदिर संगम वस्ती, श्री मळसिध व अमोघसिद्ध मंदिर मंद्रूप, श्री बसवेश्वर मंदिर भतगुणकी, श्री महादेव मंदिर सोरेगाव, श्री गजानन महाराज मंदिर सोरेगाव आणि श्री साईबाबा मंदिर होटगी येथे हा जलाभिषेक करण्यात येणार आहे.
‘विश्वशांती, मानवकल्याण आणि जलसमृद्धी’ या भावनेतून आयोजित या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
—
Post Views: 19