श्रीपूर – महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भिमराव रेडे – पाटील यांच्यावर विरोधकां कडून दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाची सभा १९ ऑगस्ट रोजी घेणेस मुंबई हायकोर्टाने स्थगिती देत पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी ठेवली आहे . नगरपंचायतीच्या १७ पैकी १२ नगसेवकांनी हा प्रस्ताव दाखल केला आहे . या बाबत भिमराव पाटील यांनी आपली भूमिका मांडतांना मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही उलट सर्वसामान्यांच्या समस्या सोडवताना अनेकदा पदर पैशाने लोकविकासाची कामे केली . मला कसलीच लेखी सुचना वा नोटीस न देता माझ्यावर अविश्वास ठराव आणला जात असल्याने मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती घेतली आहे . कोर्ट निर्णय देईल तो मान्य असेल . परंतु मी कालही, आजही व उद्याही उपनगराध्यक म्हणून माझा कार्यकाल पुरा करेन असा आत्मविश्वास व्यक्त केला .
खरे तर महाळुंग ग्रामपंचायतीचे नगर पंचायती मध्ये रुपांतर होऊन पहिली पंचवार्षीक निवडणुक झाली तेव्हा पासूनच अंतर्गत राजकीय कुरघोडी सुरु झाल्या .
यात प्रामुख्याने एकूण १७ जागां मध्ये पक्षीय भूमिकेतून पाहता राहूल कुंडलिक रेडे – पाटील यांचे नेतृत्वा खाली राष्ट्रवादी( आत्ता भाजपा ) चे सर्वाधिक ६ नगरसेवक निवडून आले .
परंतु विद्यमान उपनगराध्यक्ष भिमराव रेडे – पाटील यांचे गटाचे ५ तर नानासाहेब मुंडफणे गटाचे ४ नगसेवक निवडून आले . हे दोन्ही गट मोहीते – पाटील यांना मानणारे असल्याने मोहीते पाटील समर्थकांची सत्ता स्थापन झाली. यात भाजपाच्या अनिल जाधव गटाचा व कॉंग्रेसचा प्रत्येकी १ जण निवडून आला . भिमराव पाटील गटाच्या लक्ष्मी अशोक चव्हाण या पहिल्या नगराध्यक्ष झाल्या . परंतु काही महिन्यातच त्यांचा भिमराव पाटील गटाशी दुरावा निर्माण झाला .परंतू अशाही परिस्थितीत कामकाज चालू होते .
परंतु सर्व अलबेल नव्हते कारण काही दिवसात निनाद पटवर्धन यांनीही भिमराव रेडे – पाटील गटाची साथ सोडली .
तर मोहीते पाटील समर्थक नानासाहेब मुंडफणे यांच्या गटातील नाजीया मोहसीन पठाण या राहूल रेडे- पाटील गटात सामील झाल्या . एका बाजूला असा राजकिय खेळखंडोबा तर दुसऱ्या बाजूला मुख्याधिकारी नसल्याने विकास कामांचा बोजवारा उडणारी परिस्थिती या चक्रातच नगरपंचायतीची साडे चार वर्ष उलटून गेली .
हे होत असताना १७ पैकी १२ नगरसेवकांनी नगराध्यक्ष लक्ष्मी चव्हाण यांना लेखी निवेदन देत उपनगराध्यक्षांवर अविश्वास दाखल करण्यासाठी सभा बोलविणेची विनंती केली . त्या प्रमाणे त्यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे परवानगी मागत पीठासीन अधिकारी नेमणेची विनंती केली होती त्या प्रमाणे १९ ऑगस्ट रोजी सभा घेण्यास परवानगी मिळाली होती . यास स्थगिती मिळाली असून २५ ऑगस्ट रोजी काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
. . . . . .. .. . . . . . .. . . .. … . . . . . . . . . .. . .
.अविश्वास दाखल करणारे नगरसेवक .
राहुल कुंडलिक रेडे – पाटील, सविता शिवाजी रेडे, जोस्ना रावसाहेब सावंत – पाटील , तानाजी नवनाथ भगत, सोमनाथ रघुनाथ मुंडफणे , नानासाहेब सुदाम मुंडफणे, प्रकाश वामन नवगिरे, तेजश्री विकमसिंह लाटे , शारदा नामदेव पाटील, नाजीया मोहसीन पठाण , नामदेव हरीबा इंगळे .