सोलापूर – प्रसिद्ध पार्श्वगायक मुकेश यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त सोलापुरातील संगीत रसिकांसाठी गुरुवार, दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी एका विशेष संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. डफरीन चौकातील इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल येथे सायंकाळी ठीक साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
सोलापुरातील नवीन व होतकरू कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. ‘एस. कुमार सिंगिंग ग्रुप’ सोलापूरचे प्रमुख डॉ. संजयकुमार मुरूमकर व डॉ. सुरेश खमितकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांच्या हस्ते होणार असून, किडनी केअर हॉस्पिटलचे डॉ. नीलरोहित पैकी हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत.कार्यक्रमात सोलापुरातील अनेक नामवंत गायक व गायिका मुकेश यांच्या अमर गीतांचे सादरीकरण करणार आहेत.सोलापुरातील सर्व संगीतप्रेमी रसिकांनी आपल्या परिवार व मित्र-मैत्रिणींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सदाबहार गीतांच्या मैफिलीचा आनंद घ्यावा आणि कलाकारांनाोत्साहित करावे, असे आवाहन आयोजक डॉ. संजयकुमार मुरूमकर व डॉ. सुरेश खमितकर यांनी केले आहे.
——–



















