सांगोला – पैगंबर जयंतीनिमित्त जिल्हा परिषद उर्दू शाळा, सांगोला येथे विद्यार्थ्यांसाठी ‘कानून-ए-शरियत’ या विषयावर प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक फारुख भुसरी यांनी मनोगतात विद्यार्थ्यांना पैगंबरांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. प्रश्नमंजुषेत सायमा शेख, मंतशा अन्सारी, खदिजा बागवान, गुलफिशा अन्सारी, सबा शेख, मदीहा बागवान, अब्दुलरहमान शेख, जिकरुल्ला अन्सारी यांनी यश संपादन केले. याप्रसंगी आयाज मणेरी, महंमदगौस नाडेवाले, शकील तांबोळी, कादीर इनामदार तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुलूस कमिटीचे अध्यक्ष मोईन तांबोळी, एजाजअहमद शेख, ऐफाज तांबोळी, सोहेल मुलाणी, गुलामगौस तांबोळी यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 13