सांगोला – सांगोला येथील फॅबटेक इंजिनिअरिंग महाविद्यालयाला नॅक समितीचा ए मानांकान प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षण न देता तसेच परीक्षार्थी न बनविता भारताचा एक सुज्ञ व सुजाण नागरिक बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून महाविद्यालय शिक्षण देत आहे. अशा या महाविद्यालयात आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडले आहेत. भविष्यात ही जास्त जास्त विद्यार्थ्यांना नामंकित बहुराष्ट्रीय कंपनीत प्लेसमेंट देण्यासाठी फॅबटेक प्रयत्न करणार असल्याचे डाॅ.अमित रूपनर यांनी सांगितले. ते पञकारांशी संवाद साधताना बोलत होते.
फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजने शासकीय व निमशासकीय नोकरीच्या संधी याशिवाय उद्योजक क्षेत्रातील अनेक करिअरच्या संधी आजपर्यंत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेने आपला शैक्षणिक क्षेत्रातील ठसा जगभर उमटवला आहे त्यामुळे येथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत सहजरीत्या प्लेसमेंटची संधी प्राप्त होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगिंण विकास कसा होईल याकडे महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग जातीने लक्ष देत असतात, असेही डाॅ.अमित रूपनर यांनी यावेळी स्पष्ट केले.
Post Views: 18