पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील विजयालक्ष्मी जयंत गोरे यांना याञी आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .पंढरपूर _मंगळवेढा तालुक्याचे आ.समाधान आवताडे, माढयाचे आ.अभिजीत पाटील, सुभाषराव माने सर, बि.पी रोंगे सर तसेच इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षिका विजयालक्ष्मी जयंत गोरे यांना शिक्षण क्षेत्रातील अत्यंत मोलाच्या योगदानाची दखल विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट पंढरपूर व स्वामी विवेकानंद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर यांच्यावतीने ज्ञानयाञी आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .विजयालक्ष्मी गोरे ह्या सध्या कोर्टी येथील सिंहगड पब्लीक स्कुल मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गणीत विषयाचे अध्यापन करतात.त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सिंहगड पब्लीक स्कूलचे प्राचार्य, सर्व शिक्षक तसेच पिलीव परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. फोटो _ शिक्षिका विजयालक्ष्मी गोरे ज्ञानयाञी आदर्श शिक्षिका पुरस्कार स्विकारताना.



















