Wednesday, August 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ओवाळणीच्या पैशांतून रस्त्यावरील खड्डे बुजविले…! बहिणींच्या प्रेमाची ओवाळणी भावांच्या सुरक्षिततेसाठी

तरुण भारतbyतरुण भारत
August 26, 2026
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नव्हे, तर एकमेकांच्या सुरक्षिततेची आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस. याच भावनेला सामाजिक बांधिलकीची जोड देत बाळे येथील एकत्व सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी रक्षाबंधनाच्या ओवाळणीच्या पैशांचा उपयोग चक्क रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी केला. बहिणींनी प्रेमाने दिलेली ओवाळणी भावांच्या सुरक्षित प्रवासासाठी खर्च करून या युवकांनी समाजापुढे आगळावेगळा आदर्श निर्माण केला.
बाळे परिसरातील सोलापूर-बार्शी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने दुचाकीस्वारांसह वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. अपघाताचा धोका लक्षात घेऊन ‘एकत्व’च्या सदस्यांनी पुढाकार घेत हा प्रश्न प्रशासनाकडे सोपवून न थांबता ‘आपल्या भावांच्या सुरक्षिततेसाठी आपणही काहीतरी करूया’, या भावनेतून प्रत्यक्ष काम करण्याचा निर्णय घेतला.
मागील वर्षी रक्षाबंधनाच्या वेळी सदस्यांच्या बहिणींनी ओवाळणीसाठी दिलेल्या रकमेतून एकत्रित २ हजार ४०० रुपये जमा करण्यात आले होते. हीच रक्कम सामाजिक उपक्रमासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून मुरूम, खडी, विटांचे तुकडे तसेच खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक साहित्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सदस्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून बाळे हद्दीतील मोठमोठे खड्डे बुजविले.
बाळे परिसरात मोठी दुकाने, रुग्णालये आणि विविध व्यावसायिक आस्थापना असल्याने या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात नागरिकांची व वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था ही केवळ वाहतुकीची समस्या नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडित प्रश्न आहे. अशा परिस्थितीत बहिणींनी दिलेल्या ओवाळणीच्या पैशातून भावांनी रस्त्यावरील खड्डे बुजविणे, हा रक्षाबंधनाच्या भावनेला सामाजिक जबाबदारीची जोड देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.
या उपक्रमात पिरप्पा कोळी, किरण सरवळे, ऋषिकेश हरसुरे, राजेश केकडे, शहाबाज मकानदार, दीपक करकी, राजेश वाघमोडे, विजय वैद्य, बिलाल नदाफ आदी सदस्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
*🔲
ओवाळणीला मिळाला समाजसेवेचा अर्थ…*
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतात. त्याच सुरक्षिततेसाठी ओवाळणीची रक्कम वापरली गेल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘प्रेमाची ओवाळणी केवळ खिशात न ठेवता समाजाच्या उपयोगी आणली तर त्यातून परिवर्तनाची सुरुवात होऊ शकते,’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
*🔲“सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने बाळे-बार्शी महामार्गावर खड्ड्यांची समस्या गंभीर झाली होती. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. सदस्यांच्या बहिणींनी दिलेल्या ओवाळणीच्या पैशातून हे खड्डे बुजवून भावांच्या सुरक्षिततेसाठी हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरातील समस्या केवळ प्रशासनाकडे सोपवून न थांबता, शक्य असेल तेथे सामाजिक जबाबदारी म्हणून पुढाकार घ्यावा,*”
*दीपक करकी, एकत्व सोशल फाउंडेशन, बाळे*
Post Views: 7
Previous Post

वेणगाव पुलाजवळ कार अडवून तरुणावर हल्ला; दगडफेकीने उडवली कारची काच!

Next Post

उमरड येथे हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
उमरड येथे हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

उमरड येथे हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

ताज्या बातम्या

जीवनसाथी डॉट कॉमवरुन ओळख करुन संबंध ठेवून दोघांचे प्रायव्हेट फोटो वीडियो सोशल मीडियावर अपलोड केले प्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर

August 26, 2026

रेशन तांदूळ अपहार प्रकरणात आरोपींचा जामीन मंजूर 

August 26, 2026

४८ तासांत अंगणवाडी पोषण आहाराचा पंचनामा; निकृष्ट आहाराच्या तक्रारींनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

August 26, 2026
गजराज गणेश मिञ मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन मदने तर उपाध्यक्षपदी महेश लोखंडे

गजराज गणेश मिञ मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन मदने तर उपाध्यक्षपदी महेश लोखंडे

August 26, 2026
निरा उजवा कॅनाॅलवरील ब्रिटीशकालीन एस्केप तब्बल 16 वर्षांनंतर उघडला चार गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा

निरा उजवा कॅनाॅलवरील ब्रिटीशकालीन एस्केप तब्बल 16 वर्षांनंतर उघडला चार गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा

August 26, 2026

दोन्नतीच्या फाईलला लालफितीचा फास

August 26, 2026
५ वी जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंचे यश

५ वी जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंचे यश

August 26, 2026

गाईंना निर्दयतेने डांबून ठेवले; तिघांवर गुन्हा

August 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1119289

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!