सोलापूर – वाहनामध्ये चार्जिंग साठी लावलेला विवो कंपनीचा वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना अक्कलकोट रोड गांधीनगर येथे 23 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता घडली.
याबाबत अल्लाबक्ष गौस पिरजादे (वय-२४ वर्षे, रा-प्लॉट नं १५१ समाधान नगर अक्कलकोट रोड सोलापूर) यांनी फिर्याद दिली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादीने दि २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वा ते १ वा चे दरम्यान व्ही.पी. मुंदडा टॉवेल कारखाना गांधी नगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे भाऊ अरबाज यांची अशोक लेलँड गाडी( क्र एमएच १३ डीक्यू ८५४७)मध्ये त्याचा वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल चार्जिंग साठी लावलेला असताना अज्ञात चोरटयाने लबाडीने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार नवले हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 4