मोहोळ – मोहोळ शहरालगत नव्याने करण्यात आलेल्या कुरूल रोड शॉपिंग सेंटर ते ढोक बाभळगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट पद्धतीने झाले असून अवघ्या चार महिन्यांमध्ये रस्ता उखडला असून नगरपरिषदेने केलेली या निकृष्ट कामाबद्दल जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
मोहोळ नगर परिषदेतील अधिकाऱ्यांनी विविध विकास कामे करून मोहोळचा विकास करणे ऐवजी मोहोळ शहराच्या वाट्याला आलेला शासनाच्या पैशाचा अपव्य करून ठेकेदारांना मोठे करण्याचा जणू विडाच उचललेला आहे अशी चर्चा मोहोळ शहरात सध्या सुरू आहे.मोहोळ शहरामधून नव्याने झालेली बरीच कामे निकृष्ट पद्धतीची होऊ लागली आहेत.याबाबत मोहोळ नगर परिषदेचे अधिकारी यांची भूमिका संशयास्पद असल्याचे मोहोळच्या नागरिकांतून चर्चा होऊ लागली आहे. याचे कारण म्हणजे अवघ्या चार महिन्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून मोहोळ येथे कुरूल रोड कॅनॉलच्या बाजूने शॉपिंग सेंटर पासून ते ढोक बाबळगाव रस्त्याला जोडणारा व कॅनल वरून यापूर्वीच केलेल्या दुसऱ्या रस्त्याला समांतर असणारा कॅनॉल च्या दुसऱ्या बाजूने केलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने करण्यात आले आहे. अवघ्या चार महिन्यांमध्ये या रस्त्यावरचे डांबर निघून गेले खड्डे उघडे पडले आहेत. आतील खडी उघडी दिसत आहे अशा या चार महिन्यात अशा पद्धतीने रस्ता दिसत असल्याने मोहोळच्या नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे याबाबत नेमका किती खर्च झाला ठेकेदाराचे नाव हे लोकांना समजू नये याची नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुरेपूर दक्षता घेतल्याची दिसत आहे. या रस्त्यावर कुठेही काम संदर्भात अथवा ठेकेदारासंदर्भात कामाच्या लांबी रुंदी संदर्भात बोर्ड लावल्याचे दिसत नाही अशा कामामुळे मोहोळच्या जनतेच्या वाट्याला आलेला शासनाचा पैसा वाया गेल्याचे दिसत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व संबंधित अधिकाऱ्याकडून त्याची वसुली करावी अशी मागणी मोहोळच्या जनतेत होत आहे.
चौकट:- याविषयी प्रतिक्रिया देताना मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके म्हणाले की संबंधित ठेकेदाराचे सुरक्षा ठेव आमच्याकडे आहे काम अजून बाकी आहे संपूर्ण काम नीट झाले तरच सुरक्षा ठेव आणि उर्वरित बिल अदा करण्यात येईल
Post Views: 6