सांगोला – विधी सेवा समिती, विधीज्ञ संघ सांगोला, सांगोला महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सांगोला प्रमुख दिवाणी न्यायाधीश पी.आर.कुलकर्णी, संस्थेचे सचिव ॲड.उदयबापू घोंगडे, विधिज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड.व्ही.व्ही.बाबर, ॲड.पी.डी.देशमुख, ॲड.एस.एस.सरगर, ॲड.व्ही.एस.गायकवाड, ॲड.संपत पाटील, ॲड.राजेश्वरी केदार उपस्थित होत्या.
नॅशनल युथ डे सेलिब्रेशन विषयावर ॲड.प्रसाद देशमुख, पोस्को ॲक्ट विषयावर ॲड.एस.एस. सरगर, अँटी रॅगिंग लॉ विषयावर ॲड.व्ही.एस.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना यावेळी माहिती दिली. न्यायाधीश पी.आर.कुलकर्णी यांनी कायदेविषयक मूलभूत हक्क, युवकांची कर्तव्य, कायद्याचे ज्ञान हक्काची जाणीव सुरक्षितेचे महत्त्व समजावले. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, इतरांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी, आणि एक सजग संवेदनशील जबाबदार समाज घडविण्यासाठी कशा पद्धतीने कार्य करणे गरजेचे आहे या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमातील सर्वांचे स्वागत प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले व गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रामचंद्र पवार, प्रास्ताविक ॲड.उदयबापू घोंगडे, सूत्रसंचालन प्रा.डॉ.शितल घोंगडे यांनी केले. आभार प्रा.संतोष कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाचे संयोजन महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख डॉ.चित्रा जांभळे व रॅगिंग विरोधी समितीचे प्रमुख डॉ.भारत पवार यांनी केले.