बार्शी – रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय सैनिकांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी यांच्या वतीने सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रेम, आदर आणि आपुलकीने तयार केलेल्या राख्या सैनिकांसाठी पाठविल्या.
देशाच्या संरक्षणासाठी कुटुंबापासून दूर राहून अहोरात्र सेवा बजावणाऱ्या जवानांना रक्षाबंधनानिमित्त राखी पाठवून विद्यार्थ्यांनी ‘देशरक्षण करणाऱ्या सैनिकांशी आपलेही बंधुत्वाचे नाते आहे’ हा भावनिक संदेश दिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि सैनिकांप्रती आदराची भावना दृढ होण्यास मदत झाली. अशी भावना प्राचार्य डॉ ए बी शेख यांनी व्यक्त केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी शेख यांच्या हस्ते राख्या पाठवण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्रबंधक श्री प्रमोद जाधव, उपप्राचार्य श्री रविंद्र वायकर, वरिष्ठ लिपिक श्री संतोष कवडे, कला समन्वयक डॉ. महादेव राऊत, श्रीमती शिल्पा वाघ, श्रीमती अनिता चिंचोलकर, श्रीमती आरती पवार, डॉ. शाम कागदे, श्री विठ्ठल गुंजाळ, श्री अविनाश शेंडगे, श्री राजेश भोसले, डॉ. अजय तोडकरी, श्री संतोष भोसले, श्री भुसारे सर, कला शाखेतील विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सैनिकांना पाठविण्यात आलेल्या राख्यांसोबत शुभेच्छा संदेशही देण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
Post Views: 3