सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे भीमा नदीच्या काठावरील व मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील मोठे गाव आहे. भंडारकवठे गावाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. गावात आठवडा बाजार सुद्धा भरतो. भंडारकवठे, तेलगाव, लवंगी,सादेपूर, औज आदी गावे भीमा नदी लगत आहे. भीमा नदीच्या पात्रामधील वाळूचे लिलाव अपवादानेच होतात, इतर वेळी बेकायदेशीर पणे वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे तेथे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.
भंडारकवठे, सादेपूर या गावातून भीमा नदीवरून कर्नाटकला जोडणारे उंब्रज, लवंगी येथे पूल आहेत . येथून गुटखा, गावठी दारू, गांजा, मावा, गावठी कट्टे व गाईंची मोठ्या प्रमाणात तस्करी होते, तसेच दिवसेंदिवस महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
तसेच भंडारकवठे गावात विविध बँका, पतसंस्था, व्यापारी संकुले, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, साखर कारखाना, व विविध प्रकारचे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. भंडारकवठे परिसरातून डायल 112 ला मदतीसाठी दरमहा जास्तीत जास्त कॉल येतात, भंडारकवठे गावात पोलीस चौकी झाल्यास कुसुर, खानापूर, तेलगाव, बाळगी, निम्बर्गी, सादेपूर, लवंगी, विंचूर ,आणि वडापूर या गावातील नागरिकांची सोय होणार आहे.
भंडारकवठे गावातील नागरिकांना तक्रार नोंदविणे, आपत्कालीन मदत मिळविणे सोयीचे होईल तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या कामांसाठी गैरसोय होणार नाही व नागरिकांना मंद्रूपला ये-जा करण्यासाठी आर्थिक त्रास सहन करावा लागणार नाही.
भंडारकवठे व आसपासच्या गावात अवैध दारू विक्री, वाढती गुन्हेगारी, भांडण ,तंटे, समाज विघातक घटना तसेच रात्रीच्या वेळी होणाऱ्या बेकायदेशीर हालचाली, चोरीच्या घटना , घरफोडी, जनावरांची चोरी, मोटर सायकलची चोरी, यामध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता आहे. भंडारकवठे येथे पोलीस यंत्रणेची नियमित उपस्थिती नसल्यामुळे अशा प्रकारांना आळा बसणे कठीण होत आहे. त्यामुळे गावातील आणि आसपासच्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भंडारकवठे येथे मंद्रूप पोलीस स्टेशन अंतर्गत कायम स्वरूपी स्वतंत्र पोलीस चौकी तात्काळ सुरू करण्यात यावी आणि नियमित पोलीस गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी छावाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश मोरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















