श्रीपूर – महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भिमराव रेडे – पाटील यांच्या वर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाने खळबळ निर्माण झाली होती यावर भिमराव पाटील यांनी हायकोर्टा कडून स्थगिती आणून काही झाले तरी मी कालही,आजही, उद्याही मीच उपनगराध्यक्ष असल्याचा दावा केला होता परंतू आज त्यांनी यू टर्न घेत आपल्या पदाचा राजीनामा नगरपंचायतीने मुख्याधिकारी सचिन सावंत यांचे कडे सुपूर्त केला
भिमराव रेडे – पाटील यांचेवर दि . १९ ऑगस्ट रोजी विशेष सभे मध्ये अविश्वास ठराव आणला जाणार होता . त्याप्रमाणे सर्व नगरसेवकांना नगराध्यक्षा लक्ष्मी अशोक चव्हाण यांनी नोटीसा दिल्या होत्या .
परंतू सदर बैकठीची नोटीस मला मिळाली नाही त्यामुळे म्हणणे मांडण्यासाठी पुढील तारीख मिळावी म्हणून भिमराव रेडे – पाटील यांनी कोल्हापूर हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्या प्रमाणे कोर्टाने १९ तारखेच्या सभेस स्थगिती देत २५ ऑगस्ट ला सुनावणी ठेवली होती . पंचवीस तारखेस कोटीने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून भिमराव पाटील यांची फेटाळत सभा घेणेस परवानगी दिली एक दोन दिवसात त्या प्रमाणे सभेचे आयोजन केले जाणार होते .
परंतू त्या आधिच भिमराव पाटील यांनी अपेक्षित संख्याबळ होत नसल्याचे निदर्शनास येताच आपल्या पदाचा स्वखुषीने राजीनामा दिला .
आता कोण उपनगराध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे . परंतू हा नगराध्यक्ष अल्प काळच राहणार आहे . कारण नगरपंचायतीची मुदत संपणेस जेमतेम चार महिन्याचा कालावधी राहीला आहे .
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
नैतिकतेला स्मरून राजीनामा
गेल्या साडे चार वर्षा पासून मी उपनगराध्यक्ष म्हणून काम करताना सार्वजनिक विकासावर भर देवून काम केले . हे करताना शेवटच्या टप्यात अडचणी आणल्या गेल्या परंतू कोणालाही दोष न देता मी नैतिकतेला स्मरून राजीनामा देत आहे .
. . .. . . . . .. भिमराव रेडे – पाटील, उपनगराध्यक्ष .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















