श्रीपूर – राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट ) चे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिन्दे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कै . अजितदादा पवार स्मृतीदिना निमित्त श्रीपूर येथिल चंदशेखर विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रिडा साहित्याचे वाटप केले . यावेळी प्रथम श्रीपूर नगरीचे संस्थापक कै . चंद्रशेखर आगाशे यांच्या पुतण्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला . यानंतर विद्यार्थांना बास्केट बॉल , हॅन्ड बॉल , थाळी व गोळा फेक या किडा साहित्याचे किट देण्यात आले . या प्रसंगी शाळेचे प्राचार्य पांडुरंग बनसोडे , उपमुख्याध्यापक गवळी, क्रिडा सह शिक्षिका करुणा धाईंजे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उदयसिंह माने – देशमुख , राष्ट्रवादी (श .प.गट ) चे प्रसिद्धी प्रमुख रशिद मुलाणी, रयत क्रांती संघटनेचे राहूल बिडवे उपस्थित होते. श्रीकांत शिन्दे नियमित कै . अजितदादा पवार स्मृती निमित्त सामाजिक उपक्रम राबवितात त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज पर्यंत जेष्ठ नागरिकांसाठी वाचनालय, बालकाश्रमातील निराधारांना गणेशवेश, शालेय साहित्य, गरजू विदयार्थी, विद्यार्थींनींना मोफत सायकल वाटप असे उपक्रम राबविले आहेत .या सामाजिक सेवेच्या माध्यमातून कै . अजितदादा पवार यांचे विचार व वारसा जपणेचा श्रीकांत शिंदे अविरतपणे प्रयत्न करत आहेत .
या प्रसंगी प्रा . पांडुरंग बनसोडे यांनी श्रीकांत शिन्दे यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या क्रिडा साहित्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढून त्यांच्या गुणवत्तेत नक्कीच फरक पडेल असा विश्वास व्यक्त केला .
*माजी विद्यार्थी याचा अभिमान*
सध्या मी पंढरपूर मध्ये वास्तव्यास आहे परंतू माझे आजोळ श्रीपूर व या शाळेचा माजी विद्यार्थी असून याच शाळेत मी घडलो आज कर्तव्य भावनेतून क्रिडा साहित्य देत आहे . शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचा निश्चितच अभिमान आहे .
. . . . . . . . … श्रीकांत शिन्दे ,रा . कॉ .प्रदेश सरचिटणीस .
Post Views: 19