सोलापूर : दि प्रोग्रेसिव्ह शाळेचे मराठी विषयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक सरदार नदाफ सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गुलाम पहलवान हॉलमध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर दत्तात्रय सावंत प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षस्थानी के. बी. नदाफ उपस्थित होते. उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुऱ्हान, माजी सिनेट सदस्य डॉ. एजाज मंजूर आलम, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अब्दुल गफूर सागरी, गुरुनाथ वांगीकर आणि इब्राहिम नदाफ हे उपस्थिती होते.
सरदार नदाफ यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेत विद्यार्थ्यांना केवळ विषयाचे ज्ञान न देता त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, संस्कार आणि शिक्षणाची गोडी निर्माण केली. त्यांच्या अभ्यासपूर्ण अध्यापनाची वैशिष्ट्यपूर्ण शैली तसेच विद्यार्थ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय राहिले.
माजी विद्यार्थ्यांतर्फे विशेष सत्कार
याप्रसंगी सरदार नदाफ यांचा कृतज्ञता व्यक्त करत दि प्रोग्रेसिव्ह शाळा माजी विद्यार्थी संघटनेतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष तथा माजी युवा सेना शहर समन्वयक सय्यद वसीम अक्रम, सचिव समीर चौधरी, शोएब चौधरी, मुनाफ सुफी, फय्याज चितापूर आणि तमीम शेख यांनी सरदार नदाफ यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीतर्फे गौरव
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीतर्फेही सरदार नदाफ यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी राजेंद्र आसबे, समाधान घाडगे, मारुती गायकवाड, संजय पेंडपाले, वैभव हनमुटे तसेच भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष सुभाष भीमन्नवरू उपस्थित होते.
सेवानिवृत्ती हा सेवेला पूर्णविराम नसून आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. आपल्या ज्ञानाने आणि संस्कारांनी अनेक पिढ्यांना घडविणाऱ्या सरदार नदाफ यांना निरोगी, आनंदी आणि यशस्वी पुढील आयुष्यासाठी उपस्थितांती आपल्या भाषणात शुभेच्छा दिल्या.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















