टेंभुर्णी – टेंभुर्णी पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या रांझणी (ता. माढा) येथील शिवारात शासनाची कोणतीही परवानगी न घेता वाळूचा अवैध उपसा करून साठा केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत अंदाजे 14 हजार रुपये किमतीची 10 ब्रास वाळू आढळून आली.
टेंभुर्णी पोलिसाकडून सविस्तर मिळालेली माहिती अशी की दि. 22 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्यापूर्वी रांझणी गावच्या शिवारातील शेती गट क्रमांक 31/1 येथे ओंकार उर्फ गणेश प्रकाश कदम (रा. रांझणी, ता. माढा, जि. सोलापूर) याने त्याच्या राहत्या घराजवळ अंदाजे 10 ब्रास वाळूचा अवैध साठा केल्याचे आढळून आले.
प्रत्येक ब्रास वाळूची किंमत सुमारे 1,400 रुपये असून एकूण वाळूची किंमत 14,000 रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शासनाची संमती न घेता वाळूचा उपसा करून ती रांझणी शिवारातील गट क्रमांक 31/1 मध्ये आणून अवैधरीत्या साठविल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी दादाराम दत्तू गुटाळ (वय 57, व्यवसाय नोकरी, रा. उजनी टे., ता. माढा, जि. सोलापूर) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून ओंकार उर्फ गणेश प्रकाश कदम याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 921/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9, 15 आणि भारतीय गौण खनिज कायदा कलम 4(1), 4(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपनिरीक्षक भीमराव गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक 428 सागर शिंदे करीत आहेत.
Post Views: 13