सोलापूर – बालाजी अमाइन्स लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकी अंतर्गत ९ ते २६ वयोगटातील मुलींसाठी HPV लसीकरण उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्या मुलींना HPV लस घ्यायची आहे, त्यांनी आज, शनिवारी सकाळी ९ वाजता वाडिया हॉस्पिटल, सोलापूर येथे उपस्थित राहून HPV लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी बालाजी अमाइन्स लिमिटेडने पुढाकार घेतला असून, कंपनीच्या वतीने HPV लसीचा डोस उपलब्ध करून देण्यात येत आहे, तसेच लसीच्या डोसचा खर्च कंपनीकडून करण्यात येत आहे. वाडिया हॉस्पिटल, सोलापूर येथे HPV लसीकरणाची सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच उद्योगवर्धिनी, सोलापूर यांच्या वतीने HPV लसीकरणाबाबत जनजागृती व समन्वय करण्यात येत आहे.
या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, मागील शनिवारी मॉडर्न हायस्कुलमधील ६५ विद्यार्थीनीचे HPV लसीकरण करण्यात आले आहे. तसेच मेहता शाळेतून आतापर्यंत ८५ विद्यार्थीनीचे फॉर्म प्राप्त झाले आहेत.
HPV लसीकरणाचा लाभ अधिकाधिक मुलींना मिळावा यासाठी बालाजी अमाइन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राम रेड्डी सर यांनी ९ ते २६ वयोगटातील ज्या मुलींचे HPV लसीकरण अद्याप झालेले नाही, त्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.



















