अक्कलकोट – स्वामीराया नाटकामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतार कार्याची महिमा आणि भक्तांना आलेली प्रचिती घराघरात पोहोचेल. असे उपक्रम समाजाला अध्यात्माकडे नेणारे आहेत.
या नाटकाच्या माध्यमातून साऱ्याच भाविकांना स्वामी भक्तीची ओढ निर्माण होईल असे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन, भाजपा नेते तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी केले.
नुकतच सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे ‘स्वामीराया’ या मराठी नाटकाचा भक्ती प्रयोग सादर झाला. या भक्ती प्रयोग नाटकाचे उद्घाटन नगरसेवक महेश कल्याणराव इंगळे मालक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वामींची आरती करुन करण्यात आले. यावेळी महेश इंगळे बोलत होते.
नाट्यसेवा पाहून पुढे बोलताना चेअरमन महेश इंगळे म्हणाले की या नाटकातील कलाकारांनी स्वामी सेवेचे पात्र साकारुन आपल्या कलेला न्याय दिला आहे. प्रपंच आणि परमार्थ याची सांगड कशी घालावी याची शिकवण स्वामींनी भक्तांना दिली आहे आणि स्वामींचे हेच जीवनकार्य या नाटकाच्या माध्यमातून दर्शविण्याचे कार्य या कलाकरांनी केले आहे. आपल्याला सर्व
कलाकारांचे अगदी मनापासून कौतुक वाटते कारण सर्व कलाकारांचे जीवन या नाटकातील पात्रामुळे धन्य झाले आहे.
या सर्वांवर स्वामी कृपा कायम रहावी या करीता या नाटकाचे औचित्य साधून या गुणी कलाकारांचा आज येथे अक्कलकोट वटवृक्ष निवासी स्वामींचे कृपावस्त्र देऊन सत्कार केला आहे आणि
आणि कार्यक्रमाचे आयोजक हडदरे बंधू व सर्व कलाकारांच्या पुढील वाटचालीस तसेच स्वामीराया या नाटकाच्या पुढील नाट्य प्रयोगांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
तत्पूर्वी या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.शेखर इनामदार,मा.आमदार गणेश काका गाडगीळ, मा.दिनकर तात्या पाटील, ऑल इंडिया फार्मसी कौन्सिलचे डायरेक्टर मा.विजय पाटील, प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ.रविंद्र पाटील, कार्यक्रमाचे आयोजक सुशील हडदरे बंधू व मान्यवरांचा चेअरमन महेश इंगळे यांनी
स्वामींचे कृपावस्त्र,प्रसाद देऊन सत्कार केला. तसेच यावेळी स्वामीराया नाट्य ग्रुपच्या वतीने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी चेअरमन महेश इंगळे व अक्कलकोटचे प्रतिष्ठित उद्योजक तथा प्रगतशील शेतकरी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी डॉ. राजू मलंग,
प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, सुनील रणशिंगे, डॉ.विश्व परतूरे, सौरभ माणगांवकर, स्वामीनाथ मुसळे, धीरज कलशेट्टी, संतोष भुजंगे आदींसह अनेक ज्ञात-अज्ञात स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.