माळशिरस : माणसाच्या जीवनातील शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या पाचही स्तरांवर सकारात्मक प्रगती व्हावी, या उद्देशाने कार्यरत असलेल्या तेजज्ञान फाउंडेशन, पुणे या सामाजिक संस्थेच्या वतीने ‘तेजरथ’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. या संकल्पनेअंतर्गत संस्थेच्या विविध विषयांवरील ३०० हून अधिक पुस्तकांचा संग्रह असलेला ‘तेजरथ’ माळशिरस शहरात दाखल झाला.
‘तेजरथ’चे उद्घाटन माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापती सौ.मनीषा अमोल पाटील आणि माळशिरस शहराचे नगराध्यक्ष श्री रघुनाथ पांडुरंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. जीवनाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करणारी ही पुस्तके नागरिकांना सहज उपलब्ध व्हावीत आणि त्यांचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
उद्घाटनानंतर माळशिरस व परिसरातील नागरिकांनी ‘तेजरथ’ला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांवरील पुस्तके खरेदी केली. दिवसभरात २०० हून अधिक पुस्तकांची विक्री झाल्याने नागरिकांचा या उपक्रमाला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद अधोरेखित झाला. माळशिरस मध्ये या संस्थेचे कार्य दहा वर्षापासून चालू आहे
या प्रसंगी तेजज्ञान फाउंडेशन, माळशिरस शाखेचे वर्षा डोंबाळे , घनश्याम वाल्मीकि, डॉ.बबन काळे, आण्णासो फाळके, सुरेश कोरे, मारुती सातपुते, तरुणा वाल्मिकी, हरेश भोना यांच्यासह संस्थेचे सेवक उपस्थित होते. जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी वाचनाची गोडी वाढविणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.
Post Views: 16