पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे सहशिक्षक सत्यवान वाघमारे सर यांना पंढरपूर _ मंगळवेढा तालुक्याचे आ.समाधान आवताडे, माढयाचे आ.अभिजीत पाटील, शिक्षक नेते सुभाषराव माने, श्रीराम शिक्षण संकुलाचे प्रकाश पाटील, बि.पी रोंगे सर यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना आदर्श ज्ञानयाञी शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .तयांनी गेल्या अनेक वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेत ज्ञानदानाचे अत्यंत प्रामाणीकपणे काम केले आहे . त्याच्या ह्या शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्थानिक स्कूल कमीटी, शाळा व्यवस्थापन समीती, शिक्षक _ पालक संघ, सुरक्षा समीती,पालक, शिक्षक, आजी माजी विद्यार्थी यासह विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. फोटो _ सत्यवान वाघमारे सर यांना आदर्श ज्ञानयाञी शिक्षक पुरस्कार प्रदान करताना आ.समाधान आवताडे आ अभिजीत पाटील व इतर मान्यवर.