सोलापूर – अज्ञात कारणावरून एका 32 वर्षीय तरुणाने घरातील छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना होटगी रोडवरील विमानतळा समोर हत्तुरे वस्ती येथे शनिवारी संध्याकाळी सव्वासात वाजता उघडकीस आली.
विकास बाबुराव बोरोटे (वय 32 वर्ष, रा.हत्तुरे वस्ती, सोलापूर) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी संध्याकाळी विकास यांनी गळफास घेतला असल्याचे त्याच्या राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरील बेडरूम मध्ये आढळून आले. नातेवाईकांच्या मदतीने त्याचा गळफास सोडवून त्याला बेशुद्ध अवस्थेत येथील शासकीय रुग्णालयात मित्र धनराज परदेशी यांनी त्वरित दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.