जेऊर – यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था,पुणे यांच्या वतीने ‘ पद्मश्री डॉ. अरविंद गुप्ता विज्ञान प्रेरणा पारितोषिक’ आणि ‘केतकी हिम्मतराव शिंदे समाजदीप पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा यशकल्याणी सेवाभवन करमाळा येथे आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, विधी, उद्योग आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १५ कर्तृत्ववान महिलांना ‘केतकी हिम्मतराव शिंदे समाजदीप पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ व
मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक-अध्यक्ष मा. डॉ. अरविंद देशमुख यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान
श्री स्वामी समर्थ देवस्थान, अक्कलकोटचे विश्वस्त,
मा. श्री. संपतराव (भारतभाऊ) शिंदे पाटील यांनी भूषविले ,
प्रा. डॉ. गणेश करे-पाटील
यांच्या अभिनव कल्पना बव मार्गदर्शनातून यशकल्याणी संस्थेच्या सहकार्याने आणि संयोजनातून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला
प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. प्रचिती पुंडे, उद्योजक मा. श्री. हिम्मतराव शिंदे आणि वीरमाता सौ. अनुजाताई अरविंद निलंगे, सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड, प्रा. कल्याणराव साळुंके, प्रा. जयेश पवार उपस्थित होते.
या सोहळ्यात वक्तृत्व कलेत पारंगत व प्रभावी विचार मांडणारी कु. प्रांजली अश्विनी बाळकृष्ण लावंड, तर शहरातील झोपडपट्टीतील बालकांच्या उत्थानासाठी कार्य करणारी कु. डॉ.सायुज्या प्रचिती अक्षय पुंडे आणि विधी क्षेत्रात पदार्पण करत असलेल्या एडव्होकेट मधुरा अलका भीष्माचार्य चांदणे यांना केतकी हिम्मतराव शिंदे समाजदीप पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कर्तृत्ववान श्रेष्ठ महिला मा. डॉ. हेमा शिराळ होगाडे, नवी मुंबई; मा. ॲड. सविता शिंदे, करमाळा; मा. श्रीमती शारदाताई नटवरदास देवी, करमाळा; मा. श्रीमती हिरा केशवराव वीर, करमाळा; मा. सौ. मेघाली श्रीपाद शेटे-आडकर; मा. डॉ. स्वाती दत्तू पाटील, पी.एम.पी. कॉलेज, करमाळा; मा. डॉ. निशा चंद्रकांत सारंगकर, करमाळा, मा. सौ. चंद्रकलाताई मधुकर मारकड पाटील; मा. संध्या गौतम शिंदे-थोरे; मा. सौ. मनीषा दादासाहेब काळे; मा. सौ. निशीगंधा अनिल शेंडे; मा. सौ. प्रियांकाताई शरद जाधव; डॉ. सायुज्या अक्षय पुंडे, एड. मधुरा भीष्माचार्य चांदणे
यांचा गौरव करण्यात आला.
समाजाला दिशा देणाऱ्या कर्तृत्वाचा सन्मान आणि विद्यार्थ्यांच्या विज्ञाननिष्ठ जिज्ञासेला प्रेरणा देणारा हा सोहळा अविस्मरणीय ठरला
Post Views: 7